चिकनचे धिरडे

चिकनचे धिरडे

चिकनचे धिरडे

साहित्य :

 • १ कप मैदा
 • १ अंडे
 • १ १/२ कप दूध
 • १/२ चमचा मीठ

आत भरण्यासाठी :

 • १ १/२ कप शिजलेले चिकन
 • १ कांदा
 • १ बटाटा
 • २-३ मिरच्या
 • २-३ लसूण पाकळ्या
 • १ लहान आल्याचा तुकडा
 • मीठ
 • हळद
 • १/२ चमचा गरम मसाला

कृती :

मैद्यामध्ये अंडे, मीठ व दूध घालून पीठ मळून अर्धा तास ठेवावे. चिकन बारीक चिरुन शिजवून घ्यावे. कांदा बारीक चिरुन घ्यावा. थोड्या तेलावर कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर त्यात शिजलेले चिकन, वाटलेले आले, लसूण, मीठ, गरम मसाला, मिरच्या घालून कोरडे हिईपर्यंत परतून घावे. नंतर त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून सारखे करुन ठेवावे. बेताच्या आकाराची धिरडी घालून घ्यावीत. परतू नयेत. मध्यभागी वरील चिकन घालून डोशाप्रमाणे घडी करुन गरमागरम सर्व्ह करावीत.