चीजची बिस्कीटे

साहित्य :

  • १०० ग्रॅम मैदा
  • ५० ग्रॅम लोणी
  • २५ ग्रॅम चीज
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • चिमट्या लाल तिखट (ऐच्छिक).

कृती :

चीज किसून घ्यावा. लोणी हाताने फेसावे. त्यात चीज व मैदा मिसळावा. चांगले मिसळले की त्यात बेकींग पावडर व तिखट घालावे. पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे. पिठाची पाव इंच जाडीची पोळी लाटावी. लाटण्यापूर्वी थोडा मैदा पोळपाटावर भुरभुरावा. म्हणजे पोळी चिकटणार नाही. साचा असल्यास त्याचा वापर करावा व लहान बिस्कीटे कापावी. किंवा सुरीने चौकोनी तुकडे करावे. तुपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये ही बिस्कीटे मांडावी व मध्य्म आंचेवर सुमारे पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये भाजावी.