चिंचवडमधील तीन शिक्षक हरिहरेश्वरमध्ये बुडाले

हरिहरेश्वर

हरिहरेश्वर

चिंचवडमधील तीन शिक्षक साप्ताहिक सुटीनिमित्त हरिहरेश्वरला गेले होते व दुर्दैवाने एका समुद्रात ते बुडाले. ते तिघंही यशस्वी इंन्स्टिट्यूटमधील शिक्षक होते.

या तिन्ही शिक्षकांची नावे आहेत, निखिल गोविंदराव काळे (वय २४, रा.चिंचवड, मूळ यवतमाळ), श्वेता वाटाणे (वय २४, रा.चिंचवड, मूळ अमरावती), कुशल सताळे (वय २५, रा लोणावळा). या तिघांपैकी फक्त निखिल काळे याचाच मृतदेह सापडला आहे आणि बाकी दोन जणांचा शोध सुरु आहे. हे तिघे यशस्वी इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिकवत होते. साप्ताहिक सुटीच्या निमित्ताने शनिवारी सायंकाळी या अकरा शिक्षकांनी अचानक बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले. संस्थेतील अन्य सहकर्‍यांनी सांगितले की, इंन्स्टिट्यूटतर्फे ही सहल आयोजित केली नव्ह्ती.

शनिवारी रात्रभर प्रवास करून हे सगळेजण हरिहरेश्वरला सकाळी पोहोचले. त्यानंतर हे सगळेजण खेळायला समुद्रावर गेले. ‘रेस्ट्रिकटेड एरिया’चा बोर्ड त्यांनी त्या ठिकाणी पाहिला. मात्र, ओहोटी असल्या कारणाने पायाचे घोटे बुडतील, इतकेच पाणी होते. त्यामुळे कुठलाही धोका नसेल, या विश्वासाने हे सगळे वाळूवरुन चालत हळूहळू समुद्राकडे जाऊ लागले. पण काही कळायच्या आत श्वेता, निखिल आणि कुशल पाण्यात ओढले गेले. त्यांनी स्वतःला वाचवण्याचाही खूप प्रयत्न केला पण, तो असफल ठरला. फक्त निखिलचा मृतदेह सकाळी सापडला. अन्य दोघांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत चालू होता. मात्र, तेथील वातावरण तपासकार्यासाठी अनुकूल नव्हते. त्यामुळे अडथळा आला.

इंन्स्टिट्यूटमध्ये अन्य शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ही बातमी समजल्यावर त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते तिघंही खूप मनमिळाऊ होते. ते उत्साहाने संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी व्हायचे.