चिंतामणी थेऊर

चिंतामणी  थेऊर

चिंतामणी थेऊर

ब्रह्मासृष्ट्यादिसता स्थिरमतिरहितः पीडितो विघ्नसंधै।
आकांतो भूतिरक्त कृतिगुणरजसा जीवता त्यत्कुमिच्छन ॥
स्वात्मानं सख्यभक्त्या गणपतिममलं सेव्यचिंतामणीयम ।
मुक्तश्चास्थापयंतं स्थिरमतिसुखदं स्थावरे ढुंढि मीडे ॥२॥

अर्थ:-

सृष्टी निर्माता ब्रह्मादेवाप्रमाणे ज्याचे चित चंचल झाले आहे. जो अनेक संकटांच्या हल्ल्यामुळे त्रासलेला आहे, जो आनंदाच्या शोधात आहे. स्वकर्मामुळे जो जीवनाचा त्याग करू इच्छितो. त्याने ब्रह्मादेवाप्रमाणे स्थावर म्हणजेच थेऊरेक्षेत्री स्थापना झालेल्या स्थिरचित व सुखदायी अशा चिंतामणीची आराधना करून चित चांचल्य नष्ट करून घ्यावे. प्रजापती ब्रम्हादेवाच्या मनात एकदा थर्व म्हणजे चंचलपणा निर्माण झाला. चित्त स्थिर व्हावे म्हणून त्याने श्रीगणेशाची आराधना केली. ज्या ठिकाणी ब्रह्मादेवाचे चित्त स्थिर झाले. ती जागा म्हणजे ’स्थावर क्षेत्र’ अथवा थेऊर. मुंबईहून खंडाळ्याचा बोरघाट ओलांडून पुण्यनगरीत प्रवेश केला, की, अष्टविनायकाच जवळचे स्थान म्हणजे थेऊर. पौराणिक आणि ऐतिहासीक महात्म्य लाभलेले थेऊर अनेक कारणांसाठी प्रसिध्द आहे.

श्रीक्षेत्र थेऊरचे भौगोलिक स्थान व मार्ग:-

पुणे जिल्ह्यात हेवली तालुक्यात पुण्यापासून २५ कि.मी. वर थेऊर येथे श्रीचिंतामणी विनायकाचे मंदिर आहे. थेऊरला तिन्ही बाजूंनी मूळा-मुठा नदीचा वेढा पडला आहे. थेऊरला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पुण्याच्या सारसबाग किंवा पूलगेट बस-स्थानकावरून थेऊरला जाण्यासाठी पी.एम.टी. च्या गाड्या सुटतात. पुणे-सोलापूर महामार्गावार हडपसरच्यानंतर लोणीच्या पुढे ३ कि.मी. अंतरावर डाव्या बाजुला थेऊरचा फाटा आहे. थेऊरला फक्तऊसाची शेती आहे. जवळच वसंतराव नाईक सहकारी साखर कारखाना आहे. ऊसाचे ट्रक भरून जाताना येथे दिसतील. थेऊरला राहून मनसोक्तऊस जरूर खावे.