चिरोटे

साहित्य :

  • २ वाट्या मैदा
  • २ चमच कडकडीत तेलाचे मोहन
  • पाव चमचा मीठ,
  • साठा :

  • अर्धी वाटी डालडा
  • २ टेबल चमचा तांदळाची पिठी.

कृती :

तांदूळ ३ दिवस भिजत घालावे. नंतर कपड्यावर पसरून वाळवावे. नंतर दळून पीठ तयार करावे.मैदा, तुपाचे मोहन व मीथ एकत्र करून पीठ भिजवावे. २ तासांनी चांगले कुटून घ्यावे. साठा तयार करण्यासाठी तूप फेसावे. कनी मोडली व लोण्यासारखे झाले की, त्यात तांदळाची पिठी घालून मिश्रण तयार करावे व बाजूला ठेवावे. मैदाच्या पिठाचे ६ भाग करा व त्याच्या पातळ पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर पातळ साठा लावा. त्यावर दुसरी पोळी पसरा. त्यावर साठा लावा व तिसरी पोळी पसरा. नंतर त्याची गुंडाळी करा. गुंडाळी करताना मधे मधे साठा लावा. अशा ३।३ पोळ्यांच्या दोन गुंडाळ्या करा. नंतर त्याचे तुकडे कापून चिरोटे लाटा व घट्ट पिळलेल्या ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा. म्हणजे वाळत नाहीत. कढईत तूप तापत ठेवा. चांगले तापले की एका वेळी एकच चिरोटा घाल. झाऱ्याने जरा दाबा. कडेने तूप उडवा. चांगला फुगला, पदर सुटले की झाऱ्याने अलगद काढून निथळा. असे सर्व तळावे. वरून पिठीसाखर किंवा साखरेचा पक्का पाक घालावा.