चुरम्याचे लाडू प्रकार १

साहित्य :

  • ५०० ग्रॅम कणीक
  • ३५० ग्रॅम पिठीसाखर
  • ४०० ग्रॅम डालडा तूप
  • ५० ग्रॅम खसखस
  • ७-८ वेलदोड्याची पूड.

कृती :

कणकेत अर्धी वाटी डालडा तुपाचे मोहनघालून घट्ट पीठ भिजवा. नंतर त्याची मुटकुळी करावी व तळावी. १ वाटी तूप अगोदर बाजूल ठेवा व उरलेल्या तुपात तळा. मुटकुळी जरा निवली की कुटावी व पितळेच्या चाळणीने चाळावी. उरलेल चाळ पुनः कुटावी. खसखस जरा भाजावी. नंतर चाळलेली मुटकुळी, पिठीसाखर, वेलदोड्याची पूड व उरलेले तूप (गरम केलेले) एकत्र करून मिश्रण कालवावे. साजूक तूप असल्यास साधे तूप न घालता वरून साजूक तूप घालावे.
नंतर लाडू वळा व खसखशीत घोळवा व बाजूला ठेवा