चुरम्याचे लाडू प्रकार २

साहित्य :

  • दीड वाटी रवा
  • दीड वाटी मैदा
  • दीड वाटी कणीक
  • ३ वाट्या तूप
  • ३ वाट्या पिठीसाखर
  • ८-१० वेलदोड्याची पूड
  • २५ ग्रॅम बेदाणा
  • २५ ग्रॅम चारोळी
  • २५ ग्रॅम खसखस भाजून घ्यावी.

कृती :

रवा, मैदा व कणीक तिन्ही एकत्र करा. त्यात ३ टेबलचमचा डालडाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवा. तासाभराने पिठाची लहान लहान मुटकूळी करून तळा. नंतर खलात घालून कुटा. पितळेच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.नंतर त्यात बेदाणे, चारोळी, वेलचीपुड, भाजलेली खसखस व पिठीसाखर घालून कालवावे. तूप गरम करावे व त्यात घालावे. सर्व मिश्रण चांगले कालवून लाडू वळावे.