चुरमुर्‍यांचे पापड

साहित्य:

  • कुरमुरे
  • बेताची हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • धणे
  • जिरेपूड
  • चवीनुसार मीठ
  • लसूण
  • आले

कृती:

तीन तास कुरमुरे पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर ते गाळून त्यात हिरवी मिरची, लसूण-आलं यांची पेस्ट घालावी. बेताची धणे-जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून कुरमुरे कणकेप्रमाणे मळावे. चांगला गोळा करून घ्यावा. नंतर लहान लिंबाएवढे गोळे करून प्लास्टिकवर गोळा ठेवून लाटा व उन्हात वाळवा.