कलेसाठी साधना अत्यंत आवश्यक

कलेसाठी साधना अत्यंत आवश्यक

‘साधनेशिवाय कोणतीही कला साध्य होत नाही. आपल्या कलेतून प्रत्येक कलावंत संस्कृतीलाच समृद्ध करीत असतो,’ असे म्हणून प्रसिद्ध विनोदी कथाकार प्रा. द. मा. मिरासदार यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रसिद्ध चित्रकार रामदास बवले यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम मिरासदार यांच्या उपस्थितीत पार पडला.