दही मूळा

साहित्य:

  • २५० ग्रॅम दही
  • २ मुळा
  • १/२ लहान चमचा लाल तिखट
  • १/४ जीरे पावडर
  • १/२ लहान चमचा मीठ
  • २ हिरवी मिरची
  • थोडेसे कोथींबीर

कृती:

मुळा किसून-मीठ टाकून ठेऊन  द्या. हिरवी मिरची व कोथींबीर बारीक चिरुन घ्या. दही गाळून घ्या. मुळातून दोन्ही हातांच्या मध्ये दाबून पाणी काढा. दही मुळा, लाल तिखट व जीरे पावडर हिरवी मिरची व कोथींबीर टाकून एकत्र करा मीठ टाकून वाढा.