दही वडा

साहित्य वड्यासाठी:

 • २०० ग्रा. १ कप धुतलेली उडीद डाळ
 • ३ कप पाणी
 • १ छोटा चमच जीरे
 • ५ ग्रा. कापलेले आले
 • एक छोटा चमचा मीठ
 • २५० ग्रा. तेल

साहित्य ( दही मिश्रणासाठी ):

 • ४०० ग्रा. दही
 • १ छोटा चमचा साखर
 • ३/४ चमचे जीरे भाजलेले आणि बारीक केलेले
 • १/२ छोटा चमचे काळे मीठ
 • २ ग्रा. सफेद काळी मिरची पावडर

सजविण्यासाठीः

 • ५ ग्रा. आले
 • ५ ग्रा. हिरवी मिरची
 • ५ ग्रा. कोथिंबीर कापलेली
 • एक चुटकी लाल मिरची पावडर
 • १ चुटकी भाजून कुटलेले जीरे
 • ४ काडी पुदीना पाने
 • ४० ग्रा. चिंचेची चटणी

कृतीः

दही वडा

दही वडा

धुतलेल्या उडदाच्या दाळीस स्वच्छ करून २ तास पाण्यात भिजवावी व काढून वाटावी. आवश्यकता असेल तर थोडे पाणी टाकावे.

एका वाटीत ठेऊन मीठ, जीरे, आले, हिरवी मिरची टाकुन चांगल्या तर्‍हेने मिळवावे. एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे कढईत तेल गरम करावे.

थोडे थोडे करून गोळे ओल्या हाताने टाकावे लालसर भुरे होईपर्यंत शिजवावे ( तळण्या अगोदर गोळ्याच्या मध्ये अंगठ्याने दाबून छिद्रा सारखे बनवावे) व काढुन द्यावे तयार वड्यांना पाण्यात नरम होई पर्यंत भिजवावे फेटलेल्या दह्यात साखर, मीठ, जीरे पावडर, काळे मीठ आणि सफेद काळी मिरी टाकावी व चांगल्या तर्‍हेने मिळवावे.

वड्यांना पाण्यातून काढुन हळुच निथळून अतिरिक्त पाणि काढुन दह्यात मिळवावे.१०-१५ मिनीट एका बाजुस ठेवावे. थंड करुन आले, हिरवी मिरची, कोथंबीर लाल मिरची पावडर, जीरे पावडर, पुदिना पाने आणि चिंचेची चटणी सजवून वाढावे.