दह्याची लस्सी

साहित्य:

  • ३ कप ताजे दही
  • २ कप पाणी
  • १/४ चमचे विलायची वाटलेली
  • २ चमचा गुलाब पाणी
  • २ मोठे चमचे साखर

कृतीः

दही, पाणी, गुलाब पाणी, विलायची व साखरेस मिक्सरमध्ये टाकावे व हायस्पिडवर पंचेचाळिस सेकंद चालवावे. थोडे थांबुन एकदा पुन्हा चालवावे नंतर बारीक केलेला बर्फ (आवश्यक वाटल्यास) टाकुन एकदा फेटावे चार ग्लास बरोबर टाकुन प्यावे.