दैव आणि मुलगा

एक मुलगा शेतांत खेळता खेळता दमला आणि जवळच एक विहीर होती तिच्या अगदी कडेवर जाऊन निजला. ते पाहून दैवाने त्यास हळूच हालवून जागे केले आणि म्हटले, ‘मुला, मी तुझा जीव वांचविला हे लक्ष्यांत ठेव. तू जर आता झोपेत लोळून या विहीरीत पडून मेला असतास तर त्याबद्दल लोकांनी मला दोष दिला असता. पण तूंच सांग, ‘हा दोष माझा होता का तुझा होता ?’