दैवी शक्तीचा माणूस

एडवर्ड ड्रीपर कोप हा अमेरिकेतील एक गृहस्थ वन्य जमातींच्या रितीभातींचा अभ्या करण्यासाठी एकदा दूरवरच्या निवीड वन्यक्षेत्रात गेला असता, तिथे राहणाऱ्या त्या नरभक्षक रानाटी लोकांनी त्याला गराडून टाकलं.

स्वच्छ व चांगला उमदा माणूस आजा आपल्याला खायला मिळणार या आनंदाने ते त्याच्याभोवती भयानक हावभाव करीत नाचू लागले असता एडवर्डला आपला मृत्यू समोर येऊन ठाकलेला दिसू लागला. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली व त्याने आपल्या तोंडातली वरची खालची कृत्रिम दातांची कवळी हाताने बाहेर काढून व ती त्या रानटी लोकांपुढे धरुन, पुन्हा होती तशी बसविली.

त्या रानटी लोकांनी कवळी कधी पाहिली नसल्याने, त्यांना तोंडातले वरचे खालचे दात काढून पुन्ही ते जसेच्या तसे बसविणारा एडवर्ड हा कुणीतरी दैवी शक्तीचा माणूस असावा असे वाटले. याला आपण मारुन खाल्ले, तर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशा समजुतीने त्यांनी त्याला बळी देण्याचा बेत रद्द केलाच, पण त्याला फ़ळे मुळे देऊन त्याला हवी ती माहिती धेऊन परत सुखरुप जाऊ दिले.