डाळ मेथीची आमटी

साहित्य :

  • १ वाटी तूरडाळ
  • २ चमचे मेथ्या
  • ३ आमसुले
  • २ चमचे गूळ
  • २ चमचे गोडा मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • कढीलिंब
  • मीठ
  • ३ वाट्या पाणी
  • फोडणीचे साहित्य

कृती :

डाळ व मेथ्या एकत्र करून शिजवून घ्यावे. हिंग, कढीलिंब, हळद, मोहरी, तिखट, मसाला घालून फोडणीला टाकावे. डाळ व मेथ्या ढवळून त्यात मीठ व गूळ घालावे. नंतर त्यात ३ वाट्या पाणी घालावे आणि शिजवताना त्यात आमसुले टाकावीत. ५ मिनिटांनंतर या आमटीला उकळी येईल तेव्हा गॅस बंद करावा.