डाळ्याचे लाडू

साहित्य :

  • ५०० ग्रॅम चिवड्याचे डाळे
  • २५० ग्रॅम गुळ
  • १ खोबऱ्याची वाटी
  • अर्धी वाटी खसखस
  • अर्धा जायफळ
  • थोडी जायपत्री
  • तूप.

कृती :

डाळे कुटून घ्यावे किंवा मिक्सरमधून काढावे. चाळणीने चाळावे. खसखस व खोबरे भाजावे व त्याचीपूड करावी. जायफळ व जायपत्री ह्यांची पूड करावी. गुळात थोडे पाणी घालून एकतारी पाक करावा. नंतर त्यात वरील सर्व पदार्थ घालून नीट ढवळावे व लाडू वळावे.