दाण्याचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम शेंगदाणे
  • २५० ग्रॅम साखर
  • अर्धा नारळ
  • ५-६ वेलदोड्यांची पूड
  • थोडा केशरी रंग
  • पाव वाटी डालडा.

कृती :

दाणे भाजून सोलावे व त्याची जाडसर पूड करावी. नंतर थोड्या तुपावर दाण्याचे कुट, बेसन भाजतो त्याप्रमाणे भाजावे.खोबऱ्याचा चव नुसताच परतून घ्या. साखरेत पाणी घालून दोनतारीपेक्षा जर जास्त पाक करा. पाकात रंग घाला.त्यात दाण्याचे कुट, खोबरे, वेलदोड्याची पूड घालून ढवळा. थोड्या वेळाने मिश्रण निवले की लाडू करा.