दाण्याच्या वड्या

साहित्य :

  • २ वाट्या भाजून सोललेले शेंगदाणे
  • २ वाट्या साखर
  • ४-५ वेलदोड्याची पूड
  • थोडेसे केशर
  • थोडा केसरी रंग
  • अर्धी वाटी तूप
  • अर्धा चमचा रोझ इसेन्स.

कृती :

दाण्यात रोझ इसेन्स व थोडे पाणी घालून मिस्करवर वाटून घ्या. नंतर दाण्याचा वाटलेला गोळा, साखर, वेलदोड्याची पूड, केशर व रंग एकत्र करून गॅसवर ठेवा. मिश्रण घट्ट होत आले की कडेन तूप सोडा व तूप लावलेल्या थालीत थाप. लगेचच वड्या पाडा.