दार्जीलिंग

दार्जीलिंग पर्वतीय शहराच्या नावाचा अर्थ ‘विजेचे स्थान’ असा होतो.

दार्जीलिंग:- पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग जिल्ह्याचे हे प्रमुख शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून २,१०० मी. उंचीवर आहे. ८,५८६ मी. उंच असलेल्या कांचनजंधा या हिमालय शिखराचे स्वच्छ उजेडात विहंगम दर्शन होते. तसेच जवळच्या टायगर हिल येथून एव्हरेस्टही दिसते. तिबेटी भाषेत या शब्दाचा अर्थ ‘जिथे इंद्राचा राजदंड(विद्युत्पात) ठेवलेला आहे’( दोडी- विद्युत्पात व लिंग -जागा), संस्कृतमध्ये ‘दुर्जय लिंग’ म्हणजेच हिमालयाचा स्वामी असलेल्या अजिंक्य अशा शिवाचे शौर्य.