२७ डिसेंबर दिनविशेष

मिर्झा गालिब, उर्दू कवी

मिर्झा गालिब, उर्दू कवी

ठळक घटना

 • १७०३ : पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.
 • १८३१ : चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
 • १९०४ : अंताजी दामोदर काळे यांनी पैसा फंडाची कल्पना मांडली. त्यातून पहिला स्वदेशी काचकारखाना उभा राहिला आणि पहिली स्वदेशी काच ५ ऑगस्ट १९०५ रोजी तयार झाली.
 • १९११ : कलकत्ता येथे राष्ट्रगीताचे प्रथम गायन केले.
 • १९३६ : जळगाव जिल्ह्यातील फ़ैजपूर येथे खेड्यातील पहिले कॉंग्रेस अधिवेशन झाले.
 • १९१८ : बृहद् पोलंड(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड.
 • १९४५ : २८ देशांनी जागतिक बॅंकेची स्थापना केली.
 • १९४५ : कोरियाची फाळणी.
 • १९४९ : इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
 • १९७८ : ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.
 • १९७९ : अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.
 • १९८५ : पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.
 • १९८६ : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.

जन्म

 • १५७१ : योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.
 • १६५४ : जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
 • १७१७ : पोप पायस सहावा.
 • १७७३ : जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.
 • १७९७ : मिर्झा गालिब, उर्दू कवी.
 • १७९८ : पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.
 • १८२२ : लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.
 • १९०१ : मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.
 • १९६५ : सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू

 • ४१८ : पोप झोसिमस.
 • १९०० : विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग, ब्रिटीश स्थापत्यशास्त्री.
 • १९६५ : देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
 • १९९७ : मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
 • २००२ : प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.
 • २००५ : केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा बहुचर्चित क्रिकेट प्रायोजक व उद्योगपति.