देवरगुड्डा खंडोबा

गुंटला ते राणी बेन्नूर रोडवर खिरे मल्लापुरा गाव आहे. तेथून पुढे देवरगुड्डा गाव म्हणजे देवाचा डोंगर असून या डोंगरावर मालतेश मल्हारी म्हाळसाकांत हे दूळा आहे. मणीमल्ल्या व मल्लीमासूर या दोन राक्षसांना तेथे मारले . त्यांची स्मारके १ मैलावर आहेत. त्यामुळे त्या देवस्थानांस त्या राक्षसांच्या नावावरून खालीलप्रमाणे नावे पडाली. मल्लेश मल्हारी मार्तंड व भैरव मालतेश म्हणतात. देऊळ हेमाडपंथी १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. सदर ठिकाणी पंच कमिटी असून लोकांच्या देणगीवर देवस्थानचा खर्च चालतो. येथील वार्षिक उत्सव चंपाषष्ठी, दसरा व माघ शु. १५ असे होतात. रविवार, सोमवार व पौर्णिमेस छबिना निघतो. येथे लग्न, मुंज इ. धार्मिक कार्ये होतात. देवस्थानची वार्षिक उलाढाल १५ लाख असून भक्तांस राहण्यासाठी धर्मशाळा आहेत. मुख्य नैवेद्य पुरणाच्या कडबूचा असतो.

लोकसंख्या :-

५,०००

मार्ग :-

धारवाड- बेंगलोर रस्त्यावर काकोळ फाट्यापासून ८ कि.मी. अंतरावर आहे.
जिल्हा धारवाड, ता. राणीबेहूर , (राणीबेन्नूर) कर्नाटक