देवपूजा

देव देव्हार्‍यातील टाक

देव देव्हार्‍यातील टाक छायाचित्र: हर्षद खंदारे

प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा(Devpuja) हे एक उत्तम साधन आहे.

हल्लीच्या संघर्षमय काळात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी आपणाला जास्त वेळही मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करावी.
यथाशक्ती, यथामती आणि मिळतील त्या उपचारांनी देवपूजा मनोभावे केली तर मनाला शांती मिळते, घरातील वातावरण पवित्र होते, प्रसन्नता प्राप्त होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.

देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते, अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो आनंद होतो.
देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात. आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे. तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.

आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो. बाकीचेलोक स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला नमस्कार करतात.
पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र, गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा, पोथी यांचे वाचा करावे.
अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे, प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत. त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊनमनोरथ पूर्ण होतात.

1 thought on “देवपूजा

  1. Pingback: अधिकमासाचे महत्त्व | Adhikmaas Mahatva

Comments are closed.