देवपूजेची मांडणी

देव्हारा आणि दिवा

देव्हारा आणि दिवा छायाचित्र: हर्षद खंदारे

देवघरातील देवांच्या मूर्ती काही तांब्याच्या, काही पितळेच्या तर काही चांदी सोन्याच्याही असतात.

गणपती बहुधा तांब्याच्या असतो बाळकृष्ण, दत्त, अन्नपूर्णा वगैरे मूर्ती पितळेच्या किंवा चांदीच्या असतात.

देवी, खंडोबा इत्यादी देवतांचे टाक चांदीचे किंवा सोन्याचेही असतात.

बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवाम्चे पंचायतन असते. पंचायतन म्हणजे पाच देवांचा एके ठिकाणी केलेला सच, शंकर, विष्णु, सूर्य, गणपती आणि देवी हे ते पाच देव असतात.

त्यांपैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे चार देव त्याच्या भोवती कमळट किंवा ताम्हणात मांदून त्यांची पूजा करावी.