धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

जन्म : १८ एप्रिल १८५८
मृत्यू : ९ नोव्हेंबर १९६२

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिल्हयाच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

पद्मविभूषणभारतरत्न म्हणून अण्णासाहेब कर्वे यांचा सम्मान केला जातो. अनाथ बालिकाश्रम, विधवांचे वसतिगृह, निष्काम कर्ममठ हे संस्कारपीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांची त्यांनी स्थापना केली.

कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले.

One thought on “धोंडो केशव कर्वे

  1. Pingback: १४ जून दिनविशेष | June 14

Comments are closed.