दुधी व चण्याची डाळ

साहित्य:

 • २५० ग्रॅम चणा डाळ
 • २५० ग्रॅम दूधी
 • मीठ चवीप्रमाणे
 • लाल तिखट
 • हळद
 • धणे पावडर
 • गरम मसाला
 • आंबट(आमसूल)पावडर
 • जीरे
 • हिंग
 • तूप

कृती:

चणा डाळ निवडून तासभर पाण्यात भिजवा. एक पातेले गॅसवर ठेऊन, दोन ग्लास पाणी टाका व चणा डाळ टाका. एक उकळी आल्यावर मीठ, हळद व चिरलेलेई दूधी टाका. आता एकत्र डाळ व दूधी शिजू द्या. डाळ शिजल्यावर त्याच्यात आंबड पावडर व उरलेले सर्व मसाले टाका, तूप कढईत गरम करून जीरे-हिंगची फोडणी द्या व लिंबू पिळून गरम वाढा.