सोपा चना मसाला

साहित्य :

  • २५० ग्रॅम काबुली चणे
  • इंच आले
  • ४ हिरव्या मिरच्या
  • २ चमचे गरम मसाला पूड
  • १ चमचा लाल तिखट
  • २ चमचे धने-जिरेपूड
  • अर्धी वाटी तेल
  • चवीनुसार मीठ

कृती :

सोपा चना मसाला

सोपा चना मसाला

आदल्या रात्री चणे भिजत घालावेत. सकाळी पाणी ओतून निथळावे. आले किसावे,मिरच्या उभ्या चिराव्या.

प्रेशर कुकरमध्ये ३ कप पाणी उकळले की चणे घालावेत. प्रेशर टाईम १५ मिनिटे शिजवावेत.

कुकर गार झाल्यावर उघडावा. चणे चाळणीवर ओतून निथळावे.

एका पातेलीत घालून सर्व मसाला व मीठ चण्यात घालून मिसळावे. आल्याचा कीस व मिरच्या वरच्या थरावर पसराव्या.

छोट्या पातेलीत तेल कडकडीत तापवावे चण्यांवर ओतावे. पाच मिनिटे मंद आंचेवर उकळू द्यावे.

परदेशात शिजलेल्या चण्याचे डबे मिळतात. त्यात मीठ असल्यास मीठाचे प्रमाण थोडे कमी करावे.