बिन‍अंड्याचा चॉकलेट केक

साहित्य :

  • दोन वाटी मैदा
  • १ वाटी पिठीसाखर
  • अर्धी वाटी कोको
  • चमचा बेकिंग सोड
  • अर्धा चमचा मीठ
  • अर्धी वाटी रिफाईंड तेल
  • १ वाटी दही/ताक
  • दीड चमचा व्हॅनिला एसेन्स

कृती :

बिन‍अंड्याचा चॉकलेट केक

बिन‍अंड्याचा चॉकलेट केक

मैदा, साखर, कोको, सोडा व मीठ एकत्र चाळावे.

त्याते तेल ताक आणि व्हॅनिला घालून मिश्रण खूप घुसळावे.

पिठात गुठळी राहू देऊ नये. तुपाचा हात फिरवलेल्या केकपात्रात मिश्रण ओतावे व मध्यम आंचेवर सुमारे २५-३० मिनिटे केक भाजावा.