फालूदा आईस्क्रिम

साहित्य:

  • २ कप व्हॅनिला आईस्क्रिम
  • १ कप फालूदा शेव
  • गुलाबाचे सरबत
  • अर्धा कप ताजे क्रीम
  • १ किलो दूध
  • २ छोटे चमचे गुलाब एसेंस
  • १/२ कप बदाम व पिस्ते
  • चार चमचे साखर

कृती:

फालूदा आईस्क्रिम

फालूदा आईस्क्रिम

दूधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा. वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाकून त्यावर जमवलेले दूध टाकावे. मग व्हॅनिला आईस्क्रिम टाकावे व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाकावे.