फणसाचे पापड

साहित्य:

  • २०/२५ पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे
  • ज्वारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ
  • दोन टी स्पून जिरे
  • अर्धा टी स्पून मिरपूड
  • मीठ
  • हिंग

कृती:

बरक्या फणसाचे गरे आठळ्या काढून मिक्सरमधूान काढावे. गराच्या दुप्पट पाणी घालून चांगले शिजवावे. त्यात जिरे, हिंग, मीठ घालावे. गर मोजून त्यात तेवढेत तांदळाचे पीठ घालावे व पापड लाटून, वाफवून (उकड देऊन) वाळवावेत.