फाट…. फाट…फटाका

रामू :

ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?

राजू :

शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.

रामू : गा S S णे!

राजू : अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.

रामू : दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…