फिरनी

साहित्य :

  • अर्धी वाटी बासमती तांदूळ
  • २ लीटर दूध
  • दीड वाटी साखर
  • ५-६ काड्या चायना ग्रास
  • ५-६ बदाम
  • ५-६ पिस्ते
  • ८-१० वेलदोड्याचे पूड
  • थोडे केशर

कृती :

तांदूळ तीन तास भिजत घाला. नंतर कपड्यावर कोरडे करून वाटून घ्या. चायनाग्रास कापून दुधात भिजवा व दूधातच थोडा वेळ उकळवा.नंतर वाटलेले तांदूल थोड्या दूधात कालवा व सर्व दूधात घाला. मोठ्या व जाड बुडाच्या पातेल्यात दूध घालून आटवा. सतत हालवत राहावे. गॅस मध्यम असावा दूध दाट झाले की त्यात साखर घाला. वेलदोड्याची पूड व केशर घालून शोभिवंत भांड्यात काढा वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला.