फ्लॉवर-गाजराचे लोणचे

साहित्य :

  • १ किलो कॉलीफ्लॉवर
  • ५०० ग्रॅम गाजरे
  • १०० ग्रॅम आले
  • १०० ग्रॅम लाल सुक्या मिरच्या (कमी तिखट असलेल्या)
  • १ जुडी पुदिना
  • २५ ग्रॅम दालचिनि
  • २० ग्रॅम मिरी
  • २० ग्रॅम लंवगा (थोड्या कमी चालतील)
  • ५ कप व्हिनीगर
  • २५० ग्रॅम गूळ
  • २५० ग्रॅम तेल
  • २५० ग्रॅम मीठ
  • ५० ग्रॅम लसूण

कृती :

कॉलीफ्लॉवर स्वच्छ करून बारीक चिरावा. पाने व मधला दांडोरा टाकून द्यावा. किंवा सूपमधे उपयोग करावा. गाजराच्या इंचभर लांबीच्या पातळ व बारीक कापट्या चिराव्या. धुतलेली भाजी पातळ फडक्यावर पसरून कोरडी होऊ द्यावी. पुदिन्याची पानेखुडावी. आले किसावे व लसूण सोलावी. लाल मिरच्यासह आले-लसूण-पुदिना थोडेसे व्हिनीगर घालून बारीक वाटावे. लवंगा, दालचिनी व मिरी यांची कुटून बारीक पूड करावी. गुळात उरलेले व्हिनीगर घालून जाड पाक करावा व बाजूला ठेवावा. भाज्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, कुटलेली पूड व मीठ एकत्र मिसळावे. एका रुंद तोंडाच्या बरणीत भरावे. त्यावर गुळाचा गार झालेला पाक ओतावा व चांगले वळावे. चौपदरी दादरा बांधून ७-८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज सकाळी हलवावी. संध्याकाळी घरात आणून ठेवावी. आठवड्यानंतर लोणचे वापरण्यास हरकत नाही. मात्र बरणी कोरड्या जागी ठेवावी.