फ्लॉवरची भजी

साहित्य :

 • १ वाटी फ्लॉवरचे तूरे
 • अर्धी वाटी डाळीचे पीठ
 • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
 • अर्धी वाटी मैदा
 • ४ चमचे टोमॅटो सॉस
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • पाव चमचा लाल तिखट
 • ४-५ लसूण पाकळ्या
 • १ कांदा
 • पाव चमचा हिंग
 • २ चमचे मीठ
 • तळण्यासाठी तेल
 • अर्धा चमचा हळद

कृती :

फ्लॉवरची भजी

फ्लॉवरची भजी

फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात पंधर मिनिटे घालून ठेवावे. पाण्यात अर्धा चमचा हळद घालावी. नंतर चाळणीवर घालून निथळावे.

वाटल्यास पुन्हा चार कप पाणी वरून हलक्या हाताने ओतावे. म्हणजे पिवळट रंग राहणार नाही. कांदा बारीक चिरावा व लसूण पाकळ्या, मीठ घालून एकत्र वाटावा.

त्यात मसाला घालावा व हे मिश्रण फ्लॉवरच्या तुऱ्यांना चोळून तुरे ताटात ठेवावेत.

तिन्ही पिठे एकत्र करावी. त्यात हिंग, तिखट, मीठ व टोमॅटो सॉस घालून कालवावे. थोडे पाणी घालून कालवावे.

थोडे पाणी घालून भज्यांच्या पिठाइतपत सरबरीत करावे. आयत्या वेळेला एकेक तुकडा पिठात बुडवून गरम तेलात घालावा व तलून गरमगरम भजी वाढावी.