फ्राइड फिश

साहित्यः

 • ६७५ ग्रा. कोड माशाचे तुकडे
 • १ कापलेला कांदा
 • १ मोठा चमचा लिंबाचा रस
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा लसणाचा गोळा
 • १ चमचा सुखी लाल मिरची पावडर
 • १॥ चमचा गरम मसाला
 • २ मोठे चमचे कोथंबीर
 • २ मोठे टोमॅटो
 • २ मोठे चमचे कॉर्नफ्लो्वर
 • ३/४ कप तेल

कृतीः

माश्यांच्या तुकड्यांना थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, मिठ, लसूण, गरम मसाला, लाल मिरची चुरा आणि कोथंबीर ग्राईन्डर मध्ये बारीक करावी. माश्यांच्या तुकड्यांना फ्रिजमधून काढून एका पेल्यात ठेवावे. त्यावर वाटलेला मसाला तसेच कॉर्नफ्लोर टाकून व्यवस्थित एकत्र करावे. एका कढईत तेल गरम करावे आणि माश्याचे तुकड्यावर मसाला व कॉर्नफ्लोर लावून पकोडे प्रमाणे तळून घ्यावे. हिरवी चटणी व पराठ्याबरोबर गरम-गरम खावे.