फळाचे सॅलेड

साहित्य:

  • १ अननस
  • २ सफरचंद
  • २ केळी
  • १ काकडी
  • २ मोठे टॉमेटो
  • २ ढोबळी मिरची
  • २ संत्री
  • १ आंबा
  • १ कप दही
  • २ मोठे चमचे क्रिम
  • २ लहान इलायची
  • १ चिमुट लाल तिखट पावडर
  • मीठ
  • काळी मिरी चवीप्रमाणे

कृती:

फळाचे सॅलेड

फळाचे सॅलेड

आंबा सोलून कुसकरून घ्या. इलायची सोलून घ्या. आंबा, दही, क्रिम, इलायची पावडर, मीठ, काळी व लाल तिखट, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढा व ठेऊन द्या.

अननस सफरचंद, केळी व काकडीचे लहान चौकोनी तुकडे करा. टोमेटो च्या बीया काढून चीरा, ढोबळी मिरची गोल करा.

संत्री सोलून तुकडे करा. चिरलेली फळे व भाज्या एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा.

वाढताना बाऊलमध्ये आधी सॅलेड टाका व नंतर परतून आंब्याची एकत्र केलेली पेस्ट टाकून वाढा.