गाढव मात्र जिवंत आहे.

इंग्लडचे एके काळचे पंतप्रधान लॉईड जॉर्ज हे एका जाहीर सभेत बोलत असता एक वृध्द मनुष्य मध्येच ओरडला, ‘अरे, हा आता आम्हाला मोठ्या गोष्टी शिकवतोय, पण हा लहान असताना याचे वडील गाढवाची गाडी हाकत होते.’

यावर लॉईड जॉर्ज पटकन श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, ‘खरं आहे हे विधान, पण त्या वेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत केवढा बदल घडून आला पाहा, माझं बालपण गेलं, माझे वडील गेले, आणि त्यांच्याबरोबर ती गाडीही गेली. आता तुम्हाला माझ्या पूर्वीच्या परिस्थितीची थोडीफ़ार कल्पना यावी, म्हणून देवानं माझं भाषण चाललं असता मध्येच गडबड उडवून देणारं वडिलांच्या वेळचं गाढव तेवढं जिवंत ठेवलयं !’

लॉईड साहेबांच्या या उत्तरानं तो वृध्द गृहस्थ अर्धमेला झाला.