गाजर बटाटा रसभाजी

साहित्य :

 • १५० ग्रॅम बटाटे
 • १५० ग्रॅम कांदे
 • १५० ग्रॅम गाजरे
 • ३ चमचे तेल
 • २ लाल मिरच्या
 • पाव चमचा मोहरी
 • पाव चमचा हळद
 • १ चमचा उडदाची डाळ
 • २ चमचे भिजवलेले शेंगदाणे किंवा काजूफ्रूट
 • १०-१२ कढीलिंबाची पाने
 • १ चमचा मीठ

कृती :

गाजर बटाटा रसभाजी

गाजर बटाटा रसभाजी

गाजरे व बटाटे धुवून उकडून ठेवावेत. सोलून लहान तुकडे चिरावेत.

कांदा बारीक चिरावा. मिरच्यांचे देठ काढून तुकडे करावेत.

एका पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी टाकावी. तडतडली की उडदाची डाळ, कढीलिंबाची पाने व शेंगदाणे/काजू घालावेत.

डाळ व दाणे तांबूस रंगावर परतून त्यावर कांदा घालावा.

कांदा मऊ झाला की मिरच्यांचे तुकडे, बटाटे, गाजरे व मीठ घालावे.

वाटीभर गरम पाणी घालावे. पाच मिनिटे मंद आंचेवर ठेवून खाली उतरवावी. गरमच वाढावी.