गाजर हलवा

साहित्य :

  • १ किलो लाल मोठी गाजरे
  • ३ वाट्या साखर
  • पाव किलो खवा
  • अर्धी वाटी तूप
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • थोडेसे काजूचे काप

कृती :

गाजरे किसून घ्या. नंतर हा कीस साध्या कुकरात ठेवून वाफवून घ्या. पाणी घालू नये.नंतर वाफेचे पाणी निथळून घ्या. तुपावर हा कीस परतूनघ्या. साखर घाला. साखरेचा पाक होऊन मिश्रण घट्टसर झाले की उतरा. खवा हाताने मोडून घ्या व थोड्या तुपावर परतावा. गाजराच्या मिश्रणात हा खवा घाला. वेलदोड्याची पूड व काजूचे कप घाल. नीट ढवळून मिश्रण सारखे करावे.