गाजराचा मुरंबा

साहित्य:

  • १ किलो गाजर
  • १ किलो साखर
  • १ ग्लास पाणी

कृती:

गाजराचा मुरंबा

गाजराचा मुरंबा

गाजर सोलून लांब चिरून घ्या. गरम पाण्यात टाकून गाजर थोडीशी शिजवून घ्या. नंतर पाण्यातून काढून त्याच पाण्यात साखर घट्ट पाक तयार करा. गरम पाकातच गाजर टाका. १० मिनीटे शिजवा व गॅस बंद करा. १ दिवसासाठी ठेऊन द्या. दुसर्‍या दिवशी पाक जर घट्ट लागत असेल तर आणखी १० मिनीटे शिजवा व गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा.