गाजराचे सांडगे

साहित्य:

 • एक किलो गाजर
 • वीतभर लांबीचे दोन मुळे
 • मध्यम आकाराची कच्ची पपई
 • अंदाजे १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या
 • अर्धा किलो टोमॅटो (चांगले पिकलेले)
 • ५० ग्रॅम तीळ
 • धणे
 • जीरे पावडर आवडीप्रमाणे
 • दोन वाटय़ा चिरलेली कोथींबीर
 • मीठ
 • हळद
 • तिखट
 • हिंग

कृती:

मोठय़ा पातेल्यात जाड किसणीवर सकाळी लवकरच गाजर, मुळे, पपई किसावीत. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथींबीर घालावी, धणे- जिरे पुड, मीठ- हिंग, हळद- तीळही घालावे. टोमॅटो बारीक चिरून त्यात घालावेत. सर्व मिश्रण चांगले मिसळावे. उन्हे येण्यापूर्वीच प्लॅस्टिकवर हलक्या हाताने मिश्रणाचे सांडगे घालावेत. (आकार गोल पण पोकळ) टोमॅटोच्या ओलाव्यासकट सांडगे घालावे. वरून पातळ कापडाने झाकावे. दुसऱ्या दिवशी सर्व सांडगे उलटावेत व दिवसभर उन्हातच ठेवावेत. सांडगे वाळविण्यासाठी अंदाजे तीन दिवस लागतात.

खुसखुशीत सांडगे डब्यात भरावेत.