गवारीचे वाळवण

साहित्य:

  • एक किलो गावरान गवार
  • एक लिंबू
  • तीळ
  • मीठ
  • एक वाटी दाण्याचा कूट
  • हिरव्या मिरचीचा ठेचा

कृती:

बाजारातून शक्यतो बारीक गवार आणून ती प्रथम धुऊन घ्यावी. ती कोरडी झाल्यावर दाण्याच्या कुटात मिरची, तीळ, मीठ, मिरची ठेचा व लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून त्यात गवार घोळून घ्यावी. लिंबाच्या रसाने कूट ओलसर होऊन गवार छान घोळली जाते. नंतर प्लास्टिकच्या कागदावर वाळवावी. कोरडी व कडक वाळल्यावर डब्यात भरून ठेवावी. ही कडक गवार खिचडी केल्यावर पापडा-लोणच्याबरोबर तेलात तळून तव्यावर किंवा फ्रायपॅनवर परतून घ्यावी. याची गोडी अवीटच लागते.