साहित्य :
- ३ वाट्या मैदा
- १ वाटी खवा
- १ टेबलस्पून खसखस
- १ वाटी पिठी साखर
- ५ वेलदोड्यांची पूड
- ४-५ काजू
- १ टेबलस्पून चारोळी
- थोडासा बेदाणा.
कृती :
मैदा, चवीसाठी थोडे मीठ व १ टे.स्पून गरम तुपाचे मोहन घालून भिजवून ठेवा.खसखस भाजून कुटून घ्या. खवा थोडा परतून घ्या. नंतर खवा, पिठीसाखर, खसखस पूड, काजूचे काप, चारोळी व बेदाणा एकत्र करून सारण तयार करा. मैद्याच्या पुऱ्या लाटून घ्या. एका पुरीवर वरील सारन थोडेसे पसरा. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा जुळवा. कातण्याने कापा व मध्यम आचेवर तळा.