गोड बालूशाही

साहित्य :

  • ४ वाट्या मैदा
  • अर्धी वाटी डाळीचे पीठ
  • १ वाटी तूप
  • अडीच वाट्या साखर
  • ५-६ वेलदोड्यंची पूड
  • तळण्यासाठी तूप.

कृती :

तूप गरमकरून घ्यावे.दोन्ही पिठे एकत्र करूनत्यात तुपाचे मोहन घालावे.नंतर पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे.साखरेत पाणी घालून दोनतारी पाक करावा. त्यात वेलदोड्याची पूड घालावी. पिठाचा मोठ्या पेढ्याएवढा गोळा घ्यावा. आपण कडबोळ्याला लांबट वलून घेतो तसे वळून घ्यावे. नंतर ह्या पिठाचे कडबोळ्याप्रमाणे करावे. पण वळताना गोल एकमेकांवर यावे. नंतर हाताने दाबून पुन्हा पेढ्याचा आकार द्यावा. ही बालुशाही जास्त खुसखुशीत होते. वरीलप्रमाणे तळा व पाकात टाका.

One thought on “गोड बालूशाही

Comments are closed.