गोंडवन

लाखो वर्षांपूर्वी भारत हा गोंडवन या महाखंडाचा एक भाग होता.

गोंडवन:- प्राचीन काळी गोंडवन किंवा गोंडवनखंड हा भारताचा बहुतांश भूभाग होता.या भूखंडात आजचे दक्षिण अमेरिका,आफ्रिका, ऑस्ट्रेलिया,अंटार्क्टिका हे खंडही मोडतात.भूगर्भीय स्तरांच्या हलचालीमुळे गोंडवनखंडाचे तुकडे पडू लागले.त्यामुळे भारतीय विभाग (भारत ऑस्ट्रेलिया प्रस्तर) हळूहळू उत्तरेकडे सरकू लागला आणि कालांतराने महाप्रचंड युरेशियन प्लेट (प्रस्तर) वर जाऊन आदळला.(अंदाजे ५ कोटी वर्षापूर्वी) भारत ऑस्ट्रेलिया प्रस्तर हा युरेशियन प्रस्तराखाली ढकलला गेला.