गुजराती कढी

साहित्य :

  • ८-१० वाट्या बेताचे आंबट ताक
  • ५-६ मिरच्या
  • आल्याचा तुकडा
  • २ टेबलस्पून डाळीचे पीठ
  • मीठ
  • थोडासा गूळ
  • २-३ लवंगा
  • १ दालचिनीचा तुकडा
  • १/२ चमचा मोहरी

कृती :

गुजराती कढी

गुजराती कढी

मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत.

डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे.

गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीलिंब व कोथिंबीर टाकावी.

नंतर हिंग, जीरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची फोडणी द्यावी.

ही कढी थोडी दाट असते. हळद घालू नये.