गुळपापडीचे लाडू

साहित्य :

  • २ वाट्या कणीक
  • १ वाटी बारीक चिरलेला गूळ
  • १ डाव भाजलेले तीळ
  • ४-५ वेलदोड्याची पूड व तूप.

कृती :

तुपावर कणीक भाजावी. छान वास आला की उतरवावी. गरम कणकेतच किसलेला गूळ घालून उलथन्याने चांगले ढवळावे. तीळ व वेलदोड्याची पूड घालून लगेचच लाडू वळावे.