गुवाहाटी

गुवाहाटी नगर प्राचीनकाळी ‘प्राग्ज्योतिष’ ‘ज्योतिषाचे शहर’ या नावे ओळखले जाई.

गुवाहाटी :- हे नगर ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे. इ.स. ४०० मध्ये गुवाहाटी हे कामरूप या हिंदू राज्याची राजधानी होती. असा उल्लेख भारतीय पुराणातही आहे. पूर्वी ते एक हिंदू तीर्थक्षेत्र व अध्ययनकेंद्रही होते.