हल्ली मी चार ओळी लिहितो

हल्ली मी चार ओळी लिहितो
अन पाचवीला पेंगतो
कविता सुचत नाही,मग
राजकारणावर बोलतो

कुणां? कसं? किती?
चुकतं!
ह्यावर माझे फावते
मनात उमटते हळूच
एक हळवी ओळ
मनातल्या मनात हरवते