हरितालिकेची आरती

हरितालिकेची आरती

हरितालिकेची आरती

जय देवी हरितालिके ॥
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओंवाळीनें ज्ञानदीपकळिकें ॥धृ०॥

हर अर्धांगी वससी ॥
जाशी यज्ञा माहेरासी ॥
तेथें अपमान पावसी ॥
यज्ञाकुंडीं गुप्त होसी ॥ जय० ॥१॥

रिघसी हिमाद्रीच्या पोटीं ॥
कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी ॥
आचरसी उठाउठीं ॥ जय० ॥ २॥

ताप पंचाग्निसाधनें ॥
ध्रूम्रपानें अधोवदनें ॥
केली बहु उपोषणें ॥
शंभु भ्रताराकारणें ॥ जय०॥३॥

लीला दाखविसी दृष्टी ॥
हें व्रत करिसी लोकांसाठीं ॥
पुन्हां वरिसी धूर्जटी ॥
मज रक्षावें संकटीं ॥ जय ० ॥४॥

काय वर्णूं तव गुण ॥
अल्पमति नारायण ॥
मातें दाखवीं चरण ॥
चुकवावें जन्ममरण ॥
जय देवी हरितालिके ॥
सखी पार्वती अंबिके ॥५॥