हंडी मटण

साहित्य :

  • १ किलो मटणाचे तुकडे
  • ७ किसलेले कांदे
  • २ इंच आल्याची पेस्ट
  • मीठ
  • अर्धा चमचा साखर
  • ४ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा कोथिंबीर
  • २ कप दही
  • १ लसणाच्या कांद्याची पेस्ट
  • अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी
  • दीड चमचा लाल मिरची
  • १ चमचा हळद
  • २ बारीक केलेले टोमॅटो
  • १ चमचा गरम मसाला

कृती :

हंडी मटण

हंडी मटण

प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.

एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परतवा.

त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परतवा.

त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट व मीठ घालून परतवा.

झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.

गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.